विजयी उपनेता न्यूज चिखली प्रतिनिधी 11/12/024 युवा नेतृत्व मा. सागर भाऊ थोरात यांचा आज भव्य असा वाढदिवस शिवमुद्रा प्रतिष्ठान च्या वतीने सिमेंट ग्राउंड कृष्णा नगर या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला मुख्य आकर्षक बिग बॉस विनर सुरज चव्हाण आणि मयुरी उत्तेकर लावणी नृत्यगणा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .
सागर भाऊ चव्हाण यांनी आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम मध्ये भाग घेऊन नेहमीच गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे .बेरोजगार तरुणांना काम देऊ त्यांना स्वतःच्या पायावर स्वावलबी होण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केला आहे .असे एक तरुण कणखर स्वाभिमानी आणि तरुणांना हवेहवेसे वाटणारे नेतृत्व भावी नगरसेवकाच्या रुपाने आपल्यासमोर येत आहे. त्या निमित्ताने सागर भाऊ यांचा वाढदिवस भव्य दिव्य साजरा करण्यासाठी शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने कृष्णा नगर परिसरातील तरुणाई एकवटलेली आहे सागर भाऊंना पुढील वाटचालीसाठी आणि वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा.