पिंपरी चिंचवड विजयी उपनेता न्यूज 17/10/025 चाकण दक्षिण आणि उत्तर माळुंगे एमआयडीसी नवी दोन पोलीस ठाणे स्थापन होणार ,नव्या ठाण्यात सह तीन उपायुक्त व सहा आयुक्त पदांना मंजुरी ,चौथ्या परिमंडळाच्या निर्मितीची तयारी सुरू झाली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाढत्या औद्योगिक विस्तारामुळे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे .चाकण दक्षिण आणि उत्तर माळके एमआयडीसी भागात दोन नवीन पोलीस ठाण्याच्या स्थापनेला शासनाच्या उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे या औद्योगिक पट्ट्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
याब यासोबत तीन नवीन उपयुक्त आणि सहा आयुक्त पदाच्या प्रस्तावना ही अंतिंम मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयात आता एकूण आठ उपयुक्त आणि 19 उपयुक्त त्यात ( एक वायरलेस विभाग ) पदे उपलब्ध होणार आहेत .
सध्या आयुक्तालयातील तीन परिमंडळांतर्गत 22 पोलीस ठाण्याचे कार्य चालते. नव्या दोन ठाण्याच्या स्थापनेनंतर ही संख्या 24 होणार असून ,चौथ्या परिमंडळाची निर्मिती करण्याची तयारी सुरू आहे .या निर्णयामुळे औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारी नियंत्रण वाहतूक व्यवस्थापन आणि नागरी सुरक्षेसाठी अधिक प्रभावी यंत्रणा कार्यरत राहणार आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.