विजयी उपनेता न्यूज आळंदी प्रतिनिधी , 28/11/025 आळंदी नगरपरिषद मधील प्रभाग क्रमांक एक मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ ज्योती अक्षय गुंडरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की,
आम्ही नागरिकांना भेटीसाठी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी अनेक समस्यांचा पाढाच आमच्यासमोर म्हणून दाखवला, रस्त्याची अवस्था बिकटआहे. पाण्याची कमतरता आहे .पाणी अनियमित येते. घंटागाडी वेळ वेळेमध्ये एकच नाही. रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढगच ढिग लागलेले दिसतात. ड्रेस लाईन ची व्यवस्था म्हणावी तशी झाली नाही अनेक ठिकाणी ती फुटलेली आहे.
त्यामुळे दुर्गंधी आणि आजार वाढत आहे.अशा विविध समस्याने प्रभाग ग्रासला आहे. त्या सर्व प्रश्नावर जाती स्वतः समोर होऊन मी प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सर्वतोपरी कटिबद्ध राहणार आहे. महिला सबलीकरणाच्या माध्यमातून महिलांना उद्योगाची प्रेरणा देऊन त्यांना स्वतःच्या पायावर स्वावलंबी करून विकासाच्या प्रवाहात आणणार आहे. प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास आहे. कोणताही जातीभेद लिंगभेद न करता सर्वसामान्य माणूस हाच माझा विकासाचा केंद्रबिंदू राहणार आहे .त्यासाठी सुजाण नागरिकांनी बंधू -भगिनींनी मतदान रुपी आशीर्वाद देऊन मला समाज सेवा करण्याची संधी द्यावी असे मी विनंती करते.