विजयी उपनेता न्यूज 30/11/025 आळंदी नगरपरिषद निवडणूक मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री सागर तुळशीराम भोसले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, मी गेल्या पंचवार्षिक मध्ये विविध विकास कामे करून या प्रभागातील नागरिकांना मूलभूत गरजा सोडवण्यासाठी मी प्रयत्न केला आहे.
प्रभागातील रस्ते मजबूत केले केले. महिला सबलीकरणाच्या माध्यमातून महिला ह्या चूल आणि मूल या पर्यंतच मर्यादित न राहता त्यांच्या हाताला काम मिळवन देण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचे व्यवसाय उभारून स्वतःच्या पायावर महिलांना स्वावलबी करण्यासाठी मी प्रयत्न केला आहे. पुढील काळामध्ये ही मला प्रभागातील चौफेर विकासासाठी आणखी मला भरीव काम करायचे आहे. त्यामध्ये रस्ते पाणीपुरवठा, आरोग्य, लाईट, असे विविध प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. गरीब बेघर नागरिकांना पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, म्हाड घरकुल योजना च्या माध्यमातून प्रभागातील बेघर नागरिकांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी मी वचनबद्ध राहणार आहे.
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रभागात संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरा बसवणार आहे. ज्येष्ठ नागरिक व बालकासाठी प्रशस्त असे गार्डन विकसित करणार आहे. आळंदी शहर हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रातून लाखो भाविक वारकरी आळंदीच्या वारीला येतात त्यामुळे येथील वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे यावर कायमस्वरूपी तोडगा मी काढणार आहे. तसेच वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मी जनजागृती करणार आहे. त्यामुळेच होऊ घातलेल्या आळंदी नगरपरिषद निवडणुकीमध्ये घड्याळा या चिन्ह समरील बटन दाबून मला मतदान रुपी आशीर्वाद देऊन समाजसेवा करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करतो.