विजयी उपनेता न्यूज ,पिंपरी चिंचवड प्रतिनिधी 5/11/025 श्री गुरुदेव दत्त प्रतिष्ठान शिवरोड मोशी या ठिकाणी सौ रूपालीताई परशुराम अल्लाट शहर संघटिका शहर प्रमुख पिंपरी चिंचवड मोशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तथा महालक्ष्मी मंडळ च्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम साजरे केले आहेत. त्यांनी काल श्री गुरुदेव जयंती निमित्त भव्य असे कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
यामध्ये सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत अभिषेक करण्यात आला. सकाळी बारा वाजता होम हवन करण्यात आले. त्यानंतर दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत श्री गुरुदेव जन्म सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला. त्यानंतर 2.30 ते ते 6.00 वाजेपर्यंत भजनी महिला मंडळाच्या भरगच्च असा कार्यक्रम ठेवण्यात आला.
त्यानंतर सायंकाळी आठ वाजल्यापासून भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शिवरस्ता ब्लू बेल्स सोसायटी परिसरातील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. श्री गुरुदेव दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने साजरा केल्यामुळे परिसरातील नागरिक परशुराम आल्लाट साहेब आणि सौ रुपाली अल्हाट ताईचे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत.