विजयी उपनेता न्यूज दि,26/11/025 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी मा.आ.महेश दादा लांडगे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा कुस्ती स्पर्धेचे आयोजन मा.युवा नेते रमेशशेठ वहिले यांच्या पुढाकारातून कुस्ती स्पर्धेचे आयोजन डुडूळगांव येथे करण्यात आले होते.
या कुस्ती स्पर्धेला मोठ्या प्रमाणात कुस्ती प्रेमींनी हजेरी लावली होती. या ठिकाणी कुस्तीसाठी भव्य असे म मैदान तयार करण्यात आले होते .रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चाललेल्या या साहसी व चित थरारक मातीतील खेळांना कुस्ती प्रेमींनी व नागरिकांनी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला. या खेळांमध्ये महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर हा 2025 चा आमदार केसरी चांदीचा गदेचा विजेता ठरला. महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराज पाटील हा 2025 चा आमदार केसरी चा उपविजेता ठरला यावेळी सर्व विजयी पैलवानांना रोख बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, सन्माननीय युवा नेते रमेशशेठ वहिले दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची एक मोठी ओळख आहे. त्यांनी महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामदैवत चैतन्य अडबंनाथ महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी रुपये 11 ,11, 111 भरीव अशी देणगीचा चेक ग्रामस्थांच्या हाती सुपूर्त करण्यात आला. युवा नेते रमेशशेठ वहिले यांनी गावचे मारुती मंदिर जीर्णोद्धार, पंढरपूर येथील गावाची नवीन धर्मशाळा या ठिकाणी भरघोस देणगी देऊन ते विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये ते अग्रेसर असतात. तसेच गरजू विद्यार्थ्यांना , महिलांना त्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे या कार्यक्रमांमध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.