विजयी उपनेता न्यूज, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी 01/01/026 पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची सध्या रनधुमाळी चालू आहे यामध्ये प्रभाग क्रमांक एक मधील लोकप्रिय उमेदवार श्री राहुल दादा सर्जेराव ( आबा )भोसले हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ते निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत.
प्रभाग क्रमांक एक मधील सर्वात तरुण तडफदार कार्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिल जाते.या प्रभागमध्ये अनेक समस्या उभे आहेत. मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत . अनधिकृत बांधकामाचा प्रश्न या भागांमध्ये मोठा आहे. रेडझोन चा विषय आहे. या भागामध्ये लोकवस्ती दाट असल्यामुळे रस्ते अरुंद व ट्रॅफिक ची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. आरोग्याची समस्या आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी राहुल दादा भोसले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणे काळाची गरज आहे. त्यांनी महिला सबलीकरणाच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना मदतीचा हात पुढे करून स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांनी मदत केली आहे. महिला ह्या फक्त चूल आणि मूल पर्यंतच मर्यादित न राहता विकासाच्या प्रवाहात त्यांना स्वाभिमानाने पुढे आणण्यासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केला आहे.
त्यांच्या उमेदवारीने प्रभागात नवचैतन निर्माण झाले असून त्यांच्या पदयात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. होतंकरू तरुण तडफदार व्यक्ती महत्त्व म्हणून राहुल दादा भोसले हे आपल्यासमोर उभे आहेत. कोणत्याही भुलथापाला व आमिषाला बळी न पडता निर्भयपणे राहुल दादा भोसले यांच्या पाठीशी उभे राहून मशाल या चिन्हासमोर बटन दाबून मला समाजसेवा करण्याची संधी द्यावी अशी अहवाल राहुल दादा भोसले यांनी केले आहे.