विजयी उपनेता न्यूज पिंपरी प्रतिनिधी:- 12/12/024 पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी भागात 50 ते 60 भंगार दुकानांना व गोदामना आग लागली ही आग इतकी भयंकर होती की सर्वत्र आगेचे धूर पसरले होते. अनेक दुकाने जळून खाक झाले येथील व्यवसायकाचे अतोनात नुकसान झाले
परंतु या घटनेमध्ये कोणते जीवित हानी झाले नाही .महापालिकेच्या तत्परतेने आणि अग्निशामक दलाच्या जवानाच्या मदतीने सदर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या दुर्घटनेनंतर कुदळवाडी भागातील बेकायदेशीर भंगार दुकान चालक आणि व्यवसायवर कठोर कारवाई करणार अशी माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सूचना दिल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी घटनास्थळी कुदळवाडी येथे जाऊन दुर्घटनेची माहिती घेतली त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंग यांची भेट घेतली. आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे हे पंधरा तारखेला स्वतः घटनास्थळी भेट देनार आहेत. झालेल्या नुकसान ग्रस्त व्यापारचसोबत संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठीमागे ठामपणे उभा आहे. येणाऱ्या
पंधरा तारखेला खासदार अमोल कोल्हे स्वतः कुदळवाडी येथील नुकसान झालेल्या व्यवसायाची भेट घेणार असून आपण या व्यवसायाच्या पाठीशी असून कोणत्याही व्यवसायिकांनी घाबरण्याची गरज नाही असा संदेश खासदार अमोल कोल्हे यांनी दिला असल्याचे सांगण्यात येत आहे .तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या व्यवसायिकांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे कोणत्याही व्यापाऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही असेही त्यांनी सांगितले आहे.