विजयी उपनेता न्यूज, आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 29/11/025 मी निवडणुकीचा प्रचार करत असताना ,प्रभागामध्ये फिरत असताना लोकांनी अनेक समस्येचा पाढाच माझ्यासमोर मांडला आहे. प्रभागामध्ये अनेक समस्य आहेत, त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नीट नाही. प्रभागामध्ये घंटागाडी वेळेवर येत नाही. ट्रेन लाईन काही ठिकाणी फुटलेल्या आहेत त्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी पसरत आहे.
पर्यायी त्यामधून नागरिकांच आरोग्याला धोका पोहोचत आहे. कचऱ्याचा प्रश्न आहे. अशा विविध प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.प्रभागातील सर्वसामान्य नागरिक हाच माझा विकासाचा अजेंडा राहणार आहे. कोणताही पक्षभेद जातीभेद न करता नगरपरिषद मधील विविध विकास कामे सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मी काम करणार आहे .त्यासाठी प्रभागातील सुजाण नागरिक बंधू भगिनींना माझी विनंती आहे की होऊ घातलेल्या आळंदी नगरपरिषद मधील प्रभाग क्रमांक चार मधील सौ.कांचन किरण येळवंडे यांच्यासमोरील कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून मला समाज सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करते.