विजयी उपनेता न्यूज :- 19/12/024 मुंबई प्रतिनिधी काल दुपारी ३.५५ वाजता नौदलाच्या बोटीने निलकमल नावाच्या प्रवासी बोटीला धडक दिली. १०१ लोकांना वाचवण्यात यश आले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे,” असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
“हा अपघात एक नेव्हीची बोट आणि फेरी बोटीच्या टक्करमुळे हा अपघात झाला आहे,”जी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार निलकमल बोट नीट चालली होती. नौदलाच्या बोटीला नवीन इंजिन लावण्यात आल्याने त्याची चाचणी घेतली जात होती.
व्हिडीओत ते उपलब्ध आहे. ते 8 नंबर आकारात बोट चालवत होते. चाचणीच्या वेळी इंजिनचा काहीतरी समस्या झाली आणि त्यांचा ताबा गेला आणि नेव्हीची बोट निलकमलवर जाऊन आदळली. त्यातून हा अपघात झाला आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आह.