पिंपरी – चिंचवड,विजयी उपनेता न्यूज 10/10/025 पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन व व्यवस्थापन सुधारण्यासाठी पाणी मीटर बसवण्याची मोहीम हाती घेतली आहे .या मोहिमेत कोणत्या व्यक्तीने किंवा समूहाने विरोध केला तर त्यांच्यावर नियमानाचा गुन्हा दाखल करा तसेच अनाधिकृत नळ जोडणी खंडित करण्याच्या कारवाईला गती द्या असे निर्देश अतिरिक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि मर्यादित पाणीसाठा लक्षात घेता शहरातील पाणीपुरवठ्याचे अचूक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचा हिशोब ठेवण्यासाठी पाण्याची गळती रोखण्यासाठी आणि अनधिकृत वापर टाळण्यासाठी महापालिकेने सर्व प्रकारच्या नळ जोडण्यावर पाणी मीटर बसवण्याचे अनिवार्य केले आहे. ही मोहीम पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाद्वारे राबवली जात आहे. या मोहिमेमुळे शहरातील प्रत्येक पाणी पट्टी धारकाची माहिती मिळेल आणि अनधिकृत नळ जोडणी पूर्णपणे संपुष्टात येईल. आतापर्यंत शहरात दहा हजारापेक्षा अधिक अनाधिकृत नळ जोडणी असल्याची माहिती समोर आली आहे . त्यामुळे आता पाणी मीटर बसवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. घरगुती वापरासाठी मीटर व नळ जोडणी खर्च पाणी पट्टी धारकाकडून पाणी बिलातून हप्त्याने वसूल केले जाणार आहे. तरी सर्व पाणी पट्टी धारकाने तात्काळ पाणी मीटर बसून घ्यावे असे आव्हान पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून करण्यात येत आहे.
याशिवाय शहरातील व्यावसायिक पाणी वापरावरील लक्ष केंद्रित करण्यात आले आहे .हॉटेल, वाशिंग सेंटर, बांधकामे ,आर ओ प्लांट्स ,रेस्टॉरंट आणि इतर सर्व व्यवसायिकांनी पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत व्यावसायिक वापर तात्काळ थांबवा ज्याने अन्याधिकृत नळ जोडणी घेतली आहे त्यांनी त्वरित नियमित करून मीटर बसवावे असे आव्हान पालिकेतून करण्यात येत आहे