पिंपरी चिंचवड – विजयी उपनेता 15/10/025 पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने 13 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण 68 तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यांत सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अ ब .क .ड .इ .फ .इ. आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्ष भूषवले. जनसंवाद सभेत अ. ब. क .ड. इ. फ . या क्षेत्रातील कार्यालयात अनुक्रमे 6 .8 .11 .14., 9 ,8 ,2 आणि 10 अशा एकूण 68 तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्याग .
यावेळी नागरिकांनी दसऱ्यानिमित्त शहरात अवैध पद्धतीने लावल्याने बॅनर काढणे, दिवाळीनिमित्त शहरात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे. नाशिक फाटा येथे नागरिकाच्या सोयीसाठी खाजगी बस थांबा निर्माण करणे. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे. उद्यानातील स्वच्छतागृहाची स्वच्छता करणे. अशाप्रकारे नागरिकांनी जनसंवाद सभेत उपस्थित राहून तक्रारी वजा सूचना मांडल्या. अशा उपक्रमामुळे नागरिकांच्या सहभागातून प्रशासन अधिक पारदर्शक व जबाबदर होईल, तसेच शहरातील नागरी सुविधाच्या उन्नतीस गती मिळेल असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला.