विजयी उपनेता न्यूज 25/11/025 चाकण नगरपरिषद निवडणूक मधील प्रभाग क्रमांक चार मधील लोकप्रिय अपक्ष उमेदवार सौ सुनंदाताई काशिनाथ बनसोडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की,
प्रभाग क्रमांक चार हा आजपर्यंत उपेक्षितच राहिला आहे .अनेक समस्याचे माहेरघर बनला आहे. या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. रस्त्याची अवस्था बिकट आहे . त्यासाठी कोणताही भेदभाव न करता मी सर्वसामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून पुढील काळामध्ये मी काम करणार आहे. सुजाण नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताचा अधिकार बजावताना विवेक बुद्धी जागृत ठेवून काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान करावे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा, स्वातंत्र्याचा ,समानतेचा आणि बंधू भावाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
मी अपक्ष उमेदवार असल्यामुळे कोणत्याही दबावाला न जुमानता जनसेवेचा वसा निर्भयपणे अविरतपणे पुढेही चालूच ठेवणार आहे .त्यासाठी सुजाण नागरिकांनी कोणत्याही अमिषाला ,अफवाला बळी न पडता आपल्या हक्काचा अर्ध्या रात्री गरजेला पडणाऱ्या सुनंदाताई काशिनाथ बनसोडे यांना मतरूपी आशीर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करून समाजसेवा करण्याची मला संधी द्यावी अशी मी विनंती करते.