विजयी उपनेता न्यूज 25/11/025 चाकण प्रतिनिधी चाकण नगरपरिषद निवडणूक प्रभा क्रमांक आठ मधील लोकप्रिय उमेदवार सौ. तृप्तीताई किशोर जगनाडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की ,मी सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळे जनसामान्यांच्या अडचणी मी जवळून पाहिले आहेत.
प्रभाग क्रमांक आठ हे एक विकासाचे आगळे वेगळे मॉडेल तयार करणार आहे. त्यामध्ये रस्ते मजबूत करणार आहे, प्रभागांमध्ये सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी मी भूमिगत गटारे चे नियोजन करणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना 24 तास पिण्याचे पाणी शुद्ध उपलब्ध करून देणार आहे. बेघर नागरिकांना रमाई आवास योजना ,पंतप्रधान आवस योजना च्या माध्यमातून घरे मिळवून देणार आहे. महिला ही फक्त चूलमूल पर्यंत मर्यादित न राहता महिला सबलीकरणाच्या माध्यमातून त्यांना लघुउद्योग ,कुठिर उद्योग उभारण्यासाठी विविध महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करून त्यांना स्वाभिमानी करून स्वतःच्या पायावर उभे करणार आहे.
नगरपरिषदेच्या विविध योजना जनसामान्यांच्या दारात खेचून आणून जनसामान्यांची जीवनमान उंचवणार आहे. त्यासाठी सुजाण नागरिकांनी कोणत्याही आमिषाला ,प्रभोलनाला आहारी न जाता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताचा अधिकार निर्भयपणे योग्य व्यक्तीला मतदान केले पाहिजे. त्यासाठी प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांनी मला प्रचंड मतरुपी आशीर्वाद देऊन समाजसेवा करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करते.