विजयी उपनेता न्यूज पिंपरी प्रतिनिधी 11/12/024 लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे रक्तदान शिबिर विष्णुपंत नेवाळे जनसंपर्क कार्यालय चेरीज स्विटच्या बाजूला स्पाईन रोड चिखली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक 11 मधील पदाधिकाऱ्यानी आयोजित केले आहे.
देशाचे एक लोकाभिमुख नेतृत्व म्हणून मा. शरद चंद्र पवार यांच्याकडे पाहिले जाते आपल्या थोर नेत्याच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गरजू रुग्णांना रक्ताची नेहमीच रक्ताची गरज भासते. रक्त हे बाजारात विकत मिळत नाही किंवा वनस्पती पासून तयार केले जात नाही. ते फक्त मानवाच्या रक्तामधूनच एकमेकांचे जीव वाचवले जाऊ शकतात हीच बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक 11 मधील कार्यकर्त्यांनी भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन 12 डिसेंबर रोजी केले आहे .या रक्तदान शिबिराला समाजातील विविध घटकातील तरुणाने उत्स्फूर्त असा पाठिंबा देऊन हे शिबिर यशस्वी करावे असे आव्हान प्रभाग क्रमांक 11 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले आहे.