विजयी उपनेता न्यूज आळंदी प्रतिनिधी 29/11/025 आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मधील प्रभाग क्रमांक दहा मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ सेन अविनाश तापकीर यांनी आमच्याशी बोलताना सांगितले की, प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे.
गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये माझ्या हातात कोणती सत्ता नसताना माझ्या स्वकर्तुत्वावर प्रभागातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले. प्रभागातील खड्डे असलेला रस्ता मजबुतीकरण केले.गटारे ट्रीटलाईन ,पाणीपुरवठा यामध्ये मी सुधारणा केली. करुणा काळामध्ये मी स्वतः घराघरात जाऊन मास्क वाटले. गरजू रुग्णाला आरोग्याची अवस्था निर्माण करून दिली. प्रभागातील रस्ता 40 फूट रुंद होता. पुढे पुढे तो अरुंद होत गेला. काही नागरिकांनी रोडवर अतिक्रमण करून रस्ता 20 फूट वर आला. त्यामुळे तो पुढे काळे कॉलनीतील प्रवेश करताना नागरिकांना मोठ्या समस्याला तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे ट्रॅफिक ची समस्या वाढली आहे.
हे सर्व प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. यामधील सुजाण नागरिक बंधू भगिनींना माझी विनंती आहे मी अशी एकमेव नगरसेविका पदाचे उमेदवार आहे की मी आजपर्यंत निर्भयपणे, निस्वार्थपणे समाजसेवा केली आहे. करणार आहे .आणि पुढेही अविरतपणे प्रभागाच्या विकासासाठी मी काम करत राहणार आहे. त्यामुळेच प्रभागातील नागरिकांना माजी कळकळीची विनंती आहे. कि प्रभाग क्रमांक दहा मधील भाजपच्या सर्व उमेदवारा प्रचंड मताने विजय करू समाज सेवा करण्याचे संधी द्यावी अशी मी विनंती करते.