विजयी उपनेता न्यूज 13/10/025 पिंपरी -चिंचवड प्रतिनिधी पिंपरी चिंचवड पालिकेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी आणि कर्मचारी हीच पालखीची खरी ताकद असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी व्यक्त केले आहे. यावेळी 36 जणांना सन्मानित करण्यात आले .या वेळी शहर अभियंता देवन्ना गट्टूवार , उपायुक्त आण्यांणा बोदडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला . निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक गुणवंत कर्मचाऱ्याना गौरवण्यात आले. यावेळी आयुक्त अण्णा बोदडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पालिकेतील सहकार्याच्या टीमवर्कमुळे आणि व वरिष्ठाच्या मार्गदर्शनामुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. यावेळी सह आयुक्त मनोज लोणार, ,सह शहर अभियंता मनोज शेठीया, उपयुक्त पंकज पाटील, सहायुक्त अतुल पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय दरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड ,जनता संपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक यांनी केले यावेळी पालिकेतील कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.