विजयी उपनेता न्यूज प्रतिनिधी दि.24/11/025 भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.महेश दादा लांडगे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित हिंदू भूषण क्रीडा महोत्सव अंतर्गत आमदार केसरी डुडूळगांव फाट वहिले पा.चौक दत्तनगर देहू आळंदी रोड पुणेरी स्वीट शेजारी या ठिकाणी सोमवार दिनांक 24 / 11/ 025 रोजी दुपारी ठीक दोन वाजल्यापासून या ठिकाणी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन मा. रमेशशेठ वहिले यांच्या पुढाकारातून साकार होत आहे.
आज मराठमोळी खेळ लुप्त होत चालले आहेत. त्यामुळे आज मा.श्री. रमेश शेठ सोपानराव पहिले यांच्या संकल्पनेतून मराठी मातीतील खेळाला चालना मिळावी महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुण अशा खेळामधून आपलं भविष्यातील वाटचाल करण्यासाठी व तरुणांना अशा मैदानी खेळामधून एक नवीन प्रेरणा मिळण्यासाठी अशा प्रकारे भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे मा.रमेशशेठ सोपानराव वहिले यांचे डुडूळगांव परिसरात मोठ्या प्रमाणात कौतुक केले जाता आहे.
यावेळेस आमदार केसरी मानाची गदा कै. वस्ताद सोपानराव वहिनी यांच्या समर्थ देण्यात येणार आहे.रमेशसेठ सोपानराव पहिले युवा नेते ,ह .भ .प .बापूसाहेब दगडू वहिले सामाजिक कार्यकर्ते मानाची गदा देण्यात येणार आहे. 50 व्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धा साकार होण्यासाठी अनेक मान्यवराचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.यामध्ये श्री सचिन शेठ पवार उद्योजक, निलेश शेठ वर्पे सरपंच ,श्री रवींद्रशेठ मुऱ्हे,श्रैयशदादा मूऱ्हे, श्री भरतशेठ कृष्णाची कड, विकासशेठ गणपतराव येळवंडे, सुरेशमामा प्रभू थोरवे चेअरमन, श्री सुशांत सुरेश थोरवे युवा नेते, श्री सिद्धेश्वर प्रकाश थोरवे उद्योजक, श्री मंगेशशेठ कड उद्योजक ,श्री सुभमशेठ दौंडकर उद्योजक, श्री शिवाजीसेठ मोरे दाजी, वैभवसेठ गुजर उद्योजक, प्रदीप भाऊ पवार युवा नेते यांच्यासह अनेक मान्यवरांचे या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळेच हा भव्य दिव्य असा मा.आ.महेश दादा लांडगे यांच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन साकार होत आहे.