पिंपरी चिंचवड, विजयी उपनेता न्यूज 16/10/025 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा नेतृत्वाखाली चिंचवड येथे 15/ऑक्टोबर रोजी झालेल्या जनतेच्या स्थानिक तक्रारीचा थेट तोडगा काढण्यासाठी जनसंवाद कार्यक्रम संपन्न झाला. चिंचवड येथील या उपक्रमात सुमारे 3000 तक्रारी नोंदवण्यात आल्या त्यापैकी तब्बल बाराशे तक्रारीचे निराकरण तात्काळ करण्यात आले.
इतर प्रकरणावर संबंधित विभागातून कारवाई करण्यास सुरुवात झाली. या तक्रारी मुख्यत्वे पाणीपुरवठा ,समाजकल्याण ,महसूल ,बांधकाम परवानग्या ,पोलीस ,घनचक्र व्यवस्थापन ,सिटीसर्वे कार्यालय, वीज वितरण आरोग्य सहकारी संस्था आणि वाहतूक विभागाशी संबंधित होत्या. प्रत्येक विभागाकडे 200 पेक्षा अधिक अर्ज पप्त झाले आहेत. इतर प्रकरणे संबंधित विभागात विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. चिंचवड येथील जनसंवाद उपक्रमात नागरिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकाच व्यासपीठावर आले कार्यक्रमात व्हाॅट्ॲप चॉट़्बॉक्स हेल्पलाइन क्रमांक आणि डिजिटल किऑस्को यासारख्या आधुनिक माध्यमाचा वापर करून अर्ज नोंदवणे त्याचे ट्रेकिंग आणि विभागीय समन्वय सुलभ करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आज प्राप्त झालेले सर्व अर्जाची नोंद करण्यात आली आहे. मी स्वतः विभागीय कार्यालयात जाऊन पुणे विभागीय आयुक्त व महापालिका अधिकाऱ्यांशी संबंधित विषयावर चर्चा करणार आहे प्रत्येक विभागाशी संबंधित प्रतिनिधींना आवश्यक सूचना दिल्या जातील, काही ठिकाणी पीएमआरडी कडे असलेल्या भूखंडाची बेकायदेशीर खरेदी विक्री होत असल्याचे समोर येत आहे .हे फसवणूक आहे .
कशा जमिनी खरेदी करणे चुकीचे आहे. ते बोलताना म्हणाले की सर्व अर्जदा पाठपुरा केल शंभर टक्के काम होईल असे सांगत नाही पण शक्य तितके काम वरिष्ठ अधिकाऱ्याच्या समन्वयातून करून घेण्याचा प्रयत्न राहील पिंपरी चिंचवड आणि परिसरातील जनतेला माझा शब्द आहे. अजित पवार यांच्या जनसंवाद उपक्रमाने शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक व्यवहार्य तंत्रज्ञान आधारित आणि उत्तरदायी केला आहे. प्रशासनातील पारदर्शकता आणि थेट संपर्क वाढवण्याच्या ह्या दृष्टिकोनाचे यशस्वी उदाहरण ठरले आहे. पुढील काळात प्रत्येक जिल्ह्यात पुढे अशी जनसंवाद सत्रे नियमितपणे घेतली जाणार आहेत.