विजयी उपनेता 23/11/025 चाकण प्रतिनिधी चाकण नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 मधील लोकप्रिय नगराध्यक्ष पदाचे कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार संगीताताई आनंद गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, चाकण शहराचा कायापालट करायचा असेल तर तो फक्त काँग्रेस पक्षाच करू शकतो कारण काँग्रेस पक्षाची नाळ ही सर्वसामान्य नागरिकांशी जुळलेली आहे. कोणतेही स्त्री पुरुष जात-पात भेदभाव न करता काँग्रेस पक्ष तळागाळातील माणसांना आपलं समान त्याचे परिवर्तन करण्यासाठी आज तागायत झटत आहे.
येणाऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये गुंडशाही ,दडपशाही याला न जुमानता सर्व सामान्य नागरिकांनी काँग्रेसच्या पंजावर मतदान करून भयमुक्त चाकण नगरपरिषद करावी असे त्यांनी म्हटले आहे. येणाऱ्या काळामध्ये भूमिगत गटारी सांडपाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तसेच आरोग्य यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे चाकण शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे स्थानिक व्यवस्थेवर ताण पडत आहे. त्यामुळे पुढील पंचवार्षिक योजनेतील वाढत्या लोकसंख्येनुसार उपाययोजना करून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वीरुंगुळा नाना -नानी पार्क निर्माण करण्याचा माझा मानस आहे .तसेच लहान मुलांसाठी सुसज्ज असे गार्डन विकसित करणार आहे. तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी त्यांना कुटीर उद्योग, लघुउद्योग स्वतःचा निर्माण करून बेकारीपासून मुक्त करण्याचा माझा मानस आहे. शहरामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे .याला आळा घालण्यासाठी शहरांमध्ये सीसीटीव्ही ची व्यवस्था करणे ही काळाची गरज आहे ती मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. शहरातील रस्ते बकाल अवस्था झाली आहे .त्यावर कोण काहीही बोलायला तयार नाही. चाकणमधील बेघर नागरिकांना रमाई आवास योजना , प्रधानमंत्री आवास योजनाच्या माध्यमातून बेघरांना घर मिळवून देणार आहे. तसेच शहरांमध्ये फटके कुत्रे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. रात्री येता जाता कुत्रे डायरेक्ट माणसाच्या अंगावर येतात आणि चावा घेतात त्यामुळे महिला वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते यावर पण सर्वांनी एकमताने विचार करण्याची गरज आहे.
शहरातील घाणीचे साम्राज्य वाढले आहे शहराच्या आजूबाजूला कचऱ्याचे ढीग लागलेले आपल्याला दिसतात या कचऱ्यापासून दुर्गंधी निर्माण होऊन आजाराचे प्रमाण वाढले आहे. या कचऱ्यापासून ऊर्जा व प्रक्रिया उद्योग निर्माण करून कचरा हा उत्पादन देणार साधन निर्माण करणार आहे. त्यासाठी कोणत्याही कोणताही प्रभोलनला आहारी न जाता निर्भयपणे काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांला मतदान रुपये आशीर्वाद देऊन समाजसेवा करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करते.