विजयी उपनेता न्यूज, प्रतिनिधी आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक दहा मधील ( ब) लोकप्रिय उमेदवार सौ ऋतुजा अनिकेत तापकीर यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं कि, सुजान मतदार बांधवांनी मला नगरसेवक या पदासाठी संधी दिल्यास मी संधीचे सोने केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही .
प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे.महिला सबलीकरणाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना उद्योगाचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर स्वावलंबी बनवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
बेघर नागरिकांना रमाई आवास योजना ,पंतप्रधायोजनास योजना, म्हाडाच्या घरकुल योजना प्रभागात राबवून गरजू लोकांना घरे मिळून देण्यासाठी मी काम करणार आहे. प्रभागातील मुलासाठी सुसज्ज असं गार्डन विकसित करणार आहे. प्रभागातील वाढते गुन्हेगार रोखण्यासाठी सर्व प्रभात सीसीटीव्ही कॅमेरा बसवणार आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून विकास गंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचविणार आहे. त्यामुळे सुजाण नागरिकांनी मतदान रुपी आशीर्वाद देऊ मला समाजसेवा करण्याची संधी द्यावी अशी मी त्यांना विनंती करत आहे.