विजयी उपनेता न्यूज 13/12/025 बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक वीस मधील अपक्ष लोकप्रिय उमेदवार सौ.कोमल ताई गणेश कदम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की प्रभागातील आज पर्यंत निवडून आलेल्या नगरसेवकाने कोणतीच विकास कामे केली नाहीत.
त्यांनी कधीही प्रभागात फेरफटका ही मारला नाही. प्रभागातील रस्ते, पाणी ,भूमिगत गटारे ,आरोग्य शिक्षण, असे विविध स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. कोणताही पक्षभेद ,जातीभेद न करता सर्वसामान्य माणूस हाच माझा विकासाचा केंद्रबिंदू राहणार आहे. मी प्रभागांतील बेघर नागरिकांना रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना यांच्या माध्यमातून बेघर नागरिकांना त्यांचे स्वतःचे घर मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
तसेच प्रभागातील महिलांना चूल मुल पर्यंतच मर्यादित न राहता त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. माझी प्रभागातील नागरिकांना नम्र विनंती आहे की छत्री या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान रुपी आशीर्वाद देऊन मला समाजसेवा करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करते