विजयी उपनेता न्यूज 25/11/025 चाकण नगरपरिषद निवडणूक मधील प्रभाग क्रमांक 11 मधील लोकप्रिय उमेदवार श्री. साहेबराव राजाराम कड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की प्रभागातही जनसामान्य माणूस हाच माझा विकासाचा अजेंडा असणार आहे.
आज आम्ही प्रचार करत असताना ,प्रभागांमध्ये नागरिकांशी भेटी घेत असताना त्यांनी आजपर्यंत अनेक समस्याचा आमच्यासमोर पाढाच म्हणून दाखवला. आज प्रभामध्ये रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे .ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत .पिण्याच्या पाण्याचा समस्या आहेत .वाढती लोकसंख्या शहरीकरण यामुळे आरोग्य सेववर मोठ्या प्रमाणावर ताण पडला आहे.
यासाठी मी प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे. प्रभागामध्ये 24 तास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निर्माण करणार आहे . महिला सबलीकरणा च्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळून देणार आहे. आणि त्यांना स्वतःच्या पायावर स्वावलंबी बनवणार आहे.तसेच बेघर नागरिकांना रमाई आवास योजना ,पंतप्रधान आवास योजना च्या माध्यमातून गरजू नागरिकांना घरे मिळवन देणार आहे. प्रभागाचा चौफेर विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे .
कोणताही जातीभेद स्त्री-पुरुष असा न करता प्रभागातील जनसामान्य माणूस हाच माझ्या कुटुंबातील नागरिक समजून काम करणार आहे. त्यासाठी सुजाण नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताचा अधिकार काम करणाऱ्या योग्य व्यक्तीलाच बजावला पाहिजे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे साहेबराव राजाराम कड यांच्या घड्याळा या चिन्हासमोरील बटन दाबुन मतरुपी आशीर्वाद देऊन मला समाज सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करतो.