पिंपरी चिंचवड विजयी उपनेता न्यूज प्रतिनिधी, 17/10/025 दिवाळीचा आनंद साजरा करताना गेल्या काही वर्षात शहरात दिवाळीच्या कालावधीत घडणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागामार्फत सुरक्षित दिवाळी म्हणून सुरू करण्यात आली आहे .
या मोहिमेंतर्गत आपत्कालीन परिस्थितीसाठी पूर्वतयारी तसेच विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे .नागरिकांनी सुरक्षित दिवाळी साजरी करावी असे आव्हान पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे .
दिवाळीच्या काळात नागरिकांनी आपल्या परिसरातील पार्किंग, रस्ते ,वसाहती आणि बाजारपेठेमध्ये निष्काळजीपणे फटाके फोडणे टाळावे, प्रत्येकाने स्वतःची कुटुंबाची आणि समाजाची सुरक्षा राखावी .आग लागल्यास त्वरित 101 या अग्निशामक नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधा असे आव्हान अग्निशामक विभागाकडून करण्यात आले आहे.