विजयी उपनेता न्यूज -पणे, पिंपरी चिंचवड 4 /01 / 2023 ग्रामदैवत कडजाईमाता दिनदर्शिका 2023 चे प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला ,ग्रामदैवत श्री कडजाईमाता मंदिर मध्ये श्री स्वामी समर्थ ग्रुप च्या वतीने ग्रामदैवत श्री कडजाईमाता दिनदर्शिक छापण्यात आल्या त्याचे प्रकाशन इंदुरी गावचे लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच श्री शशिकांत शिंदे व उपसरपंच सौ. ललिता शेवकर तसेच सर्व नवनिर्वाचित सदस्य व इंदोरी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सरपंच ,उपसरपंच ,सर्व नवनिर्वाचित सदस्य व इंदोरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंच व उपसरपंच सर्व निर्वाचित सदस्य यांचा सत्कार श्री स्वामी समर्थ बँन्ग्रुजो ग्रुपच्या वतीने करण्यात आला. स्वामी समर्थ ग्रुप च्या वतीने पुढेही सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात येतील असे स्वामी समर्थ ग्रुप चे सर्वेसर्वा श्री अनिकेत शिंदे यांनी सांगितले व सर्वांचे आभार मानले