पिंपरी प्रतिनिधी विजय उपनेता न्यूज 27 ऑक्टोबर 2024 पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने (अजित पवार गट )च्या वतीने अण्णा बनसोडे यांना पुन्हा संधी देण्यात आले आहे .अण्णा बनसोडे गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेली विविध विकास कामे आणि पिंपरी मतदारसंघातील त्यांचा जनसामान्यांचे दांडगा जनसंपर्क यामुळे त्यांचे विरोधकांना तगडे आव्हान दिले आहे. जनसामान्या प्रश्नाची जाण असलेला एक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून अण्णा बनसोडे यांच्याकडे पाहिले जाते.
.सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले अण्णा बनसोडे यांना समाजातील सर्व घटकांचा जवळीक सल्यामुळे ते मतदार संघातील माता-भगिनाचे प्रश्न सोडवण्याचे सतत ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे मोठा जनाधार मिळत असून, यावेळेस त्यांच्या पाठीशी भाजप आणि शिंदे गटा ची ताकत असल्यामुळे विजय पक्का मानला जात आहे.