विजयी उपनेता न्यूज:- भोसरी प्रतिनिधी न्यूज 1/ 11/ 2024 राष्ट्रीय कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी बाळासाहेब गुंड यांनी एका पत्राद्वारे हा पाठिंबा व्यक्त केला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महायुती भाजपच्या वतीने लोकप्रिय उमेदवार महेश दादा लांडगे हे उभे आहेत . महेश दादा बरोबर आम्हाला काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाल्यास आम्हाला आनंदच होईल असेही त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .
महेश दादा लांडगे हे धडाडीचे जनसामान्यांच्या प्रश्नांची जण असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. सुजान मतदार विचार करून मतदान करतील कारण, देशामध्ये नरेंद्र मोदीचे सरकार असल्यामुळे राज्यातील त्यांच्याच विचाराचे सरकार असल्यास राज्याचा विकासाला गती मिळेल , आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्यामुळे महेश दादा लांडगे यांना प्रचंड मताने विजय करणे ही काळाची गरज आहे.