विजयी उपनेता न्यूज :- चिंचवड प्रतिनिधी 2/11/ 2024- देशांमध्ये ज्या पद्धतीने देशात नरेंद्र मोदीचे मजबूत सरकार आहे. त्यांच्याच विचाराचे महाराष्ट्रात सरकार आल्यावर राज्याचा विकास करण्यासाठी कोणती अडचण येणार नाही.परिणामी मतदारसंघाचा चौफेर विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे .म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. शहरातील पिंपळे गुरव, सांगवी, पिंपळे सौदागर, वाकड या गावांचा झालेला आहे. तसा विकास अद्यापही पुनावळे गावचा झालेला नाही. मात्र आमची सर्वात मोठी कचरा डेपोची समस्या आमदार अश्विनी जगताप यांनी सोडविली. आणि त्यासाठी शंकर जगताप यांनीही ज्याप्रकारे नियोजनबद्ध पाठपुरावा केला. त्याच प्रयत्नांचे यश म्हणून आमच्या पुनावळेकरांच्या डोक्यावरून कचरा डेपोचे भूत उतरले. असाच यापुढेही आमच्या पुनावळे गावचा स्मार्ट विकास करण्यासाठी स्मार्ट व्हिजन असणारे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हेच या भागाचे आमदार असावेत आणि त्यासाठी आम्ही पुनावळेतील सर्व सोसायटी धारक एकदिलाने जगताप यांच्या पाठीशी उभे आहोत, असे आश्वासन पुनावळे गावातील सोसायटी धारकांनी शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ पुनावळे येथील सोसायट्यांमध्ये झंझावाती दौरा करण्यात आला. या प्रचार दौऱ्यात जगताप यांनी पुनावळेमधील एंफीनिटी टॉवर सोसायटी, साईप्रस सोसायटी, पुणे विले सोसायटी, रुद्राक्ष सोसायटी, डी.एस.के सोसायटी, व्ही. जे. जावडेकर सोसायटी, साईब्लिस्ट सोसायटी, मालपाणी सोसायटी, गोल्डन ट्रेजर सोसायटी, द प्रोव्हीन्स सोसायटी, संटोसा प्राईड सोसायटी, सिरिको ग्रँड सोसायटी, 7 प्लमेरिया सोसायटी सर्व सोसायट्यांना भेट देऊन तेथील रहिवाशांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
यावेळी सोयायटीधारकांनी जगताप यांचे जोरदार स्वागत केले यावेळी झालेल्या बैठकीमध्ये सोसायटीधारकांनी त्यांना येणाऱ्या दैनंदिन समस्या जगताप यांना सांगितल्या. विशेषतः चांगले रस्ते, मुबलक पाणी, प्रदूषण मुक्त परिसर, सुसज्ज उद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, नाट्यगृह या सुविधांचा अभाव असल्याची तक्रार सोसायटीधारकांनी यावेळी केल्या.