विजयी उपनेता न्यूज 11/11/024 पिंपरी प्रतिनिधी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार मा. बाळासाहेब यांच्या रूपाने विकासाचे नवे दार खुले होणार आहे. .एक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले बाळासाहेब ओव्हाळ यांना समाजातील तळागाळातील लोकांशी एक निष्ठेचे नाते आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळून काम करण्याची त्यांना सवय आहे. मतदार संघातील कष्टकरी समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्यामुळे पिंपरी मतदारसंघांमध्ये परिवर्तन होण्याची दाट शक्यता आहे .बाळासाहेब ओव्हाळ यांनी विविध विकास कामे करून त्यांनी एक जनसामान्यात आगळावेगळा ठसा निर्माण केला आहे .गरीब ,कष्टकरी, महिला, तरुण यांच्या हाताला काम देण्यासाठी त्याने सातत्याने प्रयत्न केला आहे. .वंचित घटकाला न्याय देण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न करताना दिसत आहेत.
त्यांच्या या कार्यामुळे पिंपरी मतदार संघातील लोकांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत आहे. त्यांचे चिन्ह सप्तककिरणासह पेनाची निंब आहे . मतदार संघातील ज्येष्ठ तरुण नागरिकाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे . सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेले व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेब ओव्हाळ यांच्याकडे पाहिले जाते .ते मतदार संघातील डोर टू डोर जाऊन मतदाराच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे ते सांगत आहेत. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वामुळे मतदार संघातील जनतेचा उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच त्याचा विजय निश्चित मानला जात आहे.