विजयी उपनेता न्यूज चिंचवड प्रतिनिधी, 13/11024 चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप -शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ काळेवाडी येथील पदयात्रेत नागरिकांच्या उपस्थितीने ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीचा उच्चांक मोडला. काळेवाडी परिसरात मिळालेला हा उदंड प्रतिसाद पाहून विजयाची माळ जगताप यांच्याच गळ्यात पडणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारानिमित्त काळेवाडी येथे पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
काळेवाडी गावठाण येथून पदयात्रेचा शुभारंभ झाला. त्यानंतर ज्योतिबा नगर पंचनाथ कॉलनी, उंदर्या गणपती चौक, क्रांतिवीर कॉलनी, ओंकार कॉलनी, स्त्री हॉस्पिटल, गणेश कॉलनी, कारवार चौक, अलफोन्सा स्कुल रोड, हॉटेल आठवण चौक, आदर्श चौक, बीआरटी रोड, ज्योतिबा उद्यान, पवना नगर या भागात झंझावाती दौरा झाला. यावेळी जागोजागी महिलांनी जगताप यांचे औक्षण केले. फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांच्या गजरात नागरिकांना अभिवादन करत ‘कमळ’ चिन्हाला मतदान करत मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शंकर जगताप यांच्यासारख्या विकासाची दूरदृष्टी असणारा, माणुसकी जपणारा, करारी तरीही संवेदनशील असलेल्या शंकर जगताप यांच्याकडेच चिंचवडचे नेतृत्व सोपविणार, असा ठाम निश्चय काळेवाडीकरांनी बोलून दाखविलस्व. लक्ष्मणभाऊ आणि अश्विनीताई यांच्या आमदारनिधीतून काळेवाडीत उद्यान असेल, पिंपरी पूल ते काळेवाडी गावठाण रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण असेल, पिण्याच्या पाण्याची मोठी पाईपलाईन असेल, प्रथमोपचार केंद्र अशी काही विकासकामे करण्यात आली आहेत. तर काही विकासकामे प्रलंबित अवस्थेत आहेत. या विकासकामांना गती देण्यासाठी मी सर्वात प्रथम प्राधान्य देणार असून पुढील दोन वर्षात काळेवाडी गावाचा विकासकामांच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलून ‘काळेवाडीला विकासाचा आयकॉन बनविणार’, अशी ग्वाही मी सर्व काळेवाडीकरांना देतो.