विजयी उपनेता न्यूज पिंपरी प्रतिनिधी 13/11/024 :-पिंपरी विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आघाडीचे लोकप्रिय उमेदवार मा. बाळासाहेब ओव्हाळ हे निवडणूक लढवत आहेत. पण आज पर्यंत अनेक विकास कामे केले आहेत.
महिलांच्या हाताला काम देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हा बाळासाहेब ओवाळे यांचा संकल्प आहे .कामगारांचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला आहे. शासनाच्या विविध योजना कामगाराला मिळवून विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केलाआहे. .सर्वसामान्य माणूस हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून काम केले आहे. कोणताही जातीभेद न मानता प्रत्येक माणसाला समान काम समान संधी मिळाली पाहिजे यासाठी त्यानी आज पर्यंत काम केले आहे त्यामुळेच मतदारसंघातून तरुण ,महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा मोठ्या प्रमाणात पाठीमागे मिळत असल्यामुळे बाळासाहेब ओव्हाळ यांचा विजय निश्चित मानला जात आहे.