विजय उपनेता न्यूज 06/12/024 दारव्हा प्रतिनिधी दारव्हा शहरातील जिरापुरे नगर येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या नवीन शाखेचे उद्घाटन चार डिसेंबर रोजी उपविभागीय वनाधिकारी संतोष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले . संतोष चव्हाण हे. एक वन विभातील अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली त्या ठिकाणी त्यांच्या कामाचा ठसा आजही प्रशासनामध्ये उठून दिसत आहे. संतोष चव्हाण यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. अशा व्यक्तीच्या हस्ते बँकेचे उद्घाटन होणे ही अभिमानाची बाब आहे.
.या उद्घाटन सोहळा प्रमुख पाहुणे म्हणून मुंगसाजी महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील चकके ,बँक ऑफ महाराष्ट्र चंद्रपूर अचल प्रमुख प्रमोद साबळे, नंदकिशोर जीरापुरे ,चेंबर बँक ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष रमेश सुतारवार, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नीलम सिंगी तसेच डॉक्टर गोपाल अग्रवाल ,ज्येष्ठ नागरिक कमलाकर हनवंते, डॉक्टर वसंत ,उबाळे खिलेश घेरवरा महेंद्र बजानिया, विष्णू निमकर, गजानन देशमुख राजेंद्र बंड, विनय सरतापे, नानाभाऊ राऊत ,अमोल राऊत आधी उपस्थित होते .शाखेचे प्रबंधक ओम डाखोरे यांनी उद्घाटनाच्या वेळी सर्व मान्यवराचे आभार मानले .दिग्रस शाखेचे प्रबंधक धनंजय पवार यांनी या पसंगी उपस्थित राहून शाखेच्या कामकाज बद्दल सविस्तर माहिती दिली.