विजय उपनेता न्यूज दि, 03 /01 /2023 – पुणे- पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारवर कार्यक्रमाचे प्रचार व प्रसार करण्यासाठी विचार प्रबोधन परवाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रबोधन परवाचे उद्घाटक आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.वाजता पिंपरी चिंचवड सावित्रीबाई फुले स्मारक येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे असणार आहेत .तर खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, डॉक्टर अमोल कोल्हे ,आमदार उमा खापरे,आ. लक्ष्मण जगताप ,आ .संग्राम थोपटे आ. अण्णा बनसोडे आ. महेश लांडगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील जितेंद्र वाघ ,उल्हास जगताप, यांच्यासह पालिकेचे अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित राहणार आहेत.
तत्पूर्वी पालिकेतील पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात सकाळी 10:30. वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे .त्यानंतर सकाळी 10 :35 वाजता तळमजल्यावर चित्रकार विजय शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शन उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 10:45 वाजता मोशी येथील महापालिकेच्या शाळेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे
. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित विचार प्रबोधन पर्व।च्या उद्घाटन प्रसंगी महिला बचत गट व गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार आयुक्त शेखर शिंग यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 11:30 वाजता” मी तुमची सावित्रीबाई फुले” हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एक पात्री नाट्य प्रयोग सुप्रसिद्ध कलाकार मेघना झुझम या सादर करणार आहेत. दुपारच्या सत्रात साडेबारा वाजता संगीत फ्युजन अविष्कारासह सावित्रीच्या ज्योती या सांस्कृतिक कार्यक्रम प्रसिद्ध कलाकार रितेश नगराळे सादर करणार आहेत. दुपारी 2 : 00 वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये अकोला येथील अनंत राऊत, इचलकरंजी येथील रोहित शिंगे, सोयगाव येथील डॉक्टर स्वप्निल चौधरी ,पिंपरी चिंचवड येथील अनिल दीक्षित, देहू येथील मोहम्मद शेख, हे कवी सहभागी होणार आहेत. दुपारी साडेचार वाजता सावित्रीच्या लेकी या विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्या अॅड, मनीषा महाजन, पत्रकार अश्विनी सातव डोके, अँड, निशा कांबळे सामाजिक कार्यकर्ता अनिता साबळे यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी 6.:00 वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित वंदन ज्ञानज्योतीला या संगीतमय कार्यक्रमाचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन पर्व।ची सांगता होणार असून यामध्ये सुप्रसिद्ध गायक सुधाकर वारभुवन ,मारुती जकाते सागर वेल्हाळे, अनिरुद्ध सूर्यवंशी, हे कलाकार सहभागी होणार आहेत नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आव्हान पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.