विजयी उपनेता न्यूज -: पिंपरी चिंचवड पुणे 23/ 12 /2022 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ना. श्री.जयंत पाटील साहेब यांचे सूडबुद्धिने केलेल्या निलंबनाच्या निषेधार्थ आज शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने शिंदे – भाजप सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येणार आहे .युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर श्री. इम्रान युनूस शेख तसेच शहराध्यक्ष श्री .अजित दामोदर गव्हाणे यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख नेते मंडळीच्या तसेच आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्तेचा उपस्थितीत शांततेत व लोकशाही मार्गाने निषेेध आंदोलन करण्यात येणार आहे .सदर आंदोलन दुपारी ठीक 3.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी पुणे या ठिकाणी होणार आहे.तरी या निषेध आंदोलनास जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान श्री. इम्रान युनूस शेख युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने करण्यात आले आहे.