Homeपिंपरी - चिंचवडपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी व काँग्रेसतर्फे लोकनेते श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त रॅपिड (जलद) बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी व काँग्रेसतर्फे लोकनेते श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त रॅपिड (जलद) बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
विजय उपनेता न्यूज – : पिंपरी 22 /12/ 2022 राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा )तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्वाढदिवसानिमित्त 25 डिसेंबर रोजी एक दिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
पुणे जिल्ह्याचे सर्कलतर्फे या स्पर्धेला मान्यता देण्यात आली आहे या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 25 हजार रुपये रोख , 32 मेडल्स व 16 ट्रॉफी देण्यात येणार आहे. एक दिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा खुला गट आणि वयोगट 8, 10 ,12 ,14 ,सीनियर सिटीजन महिला गट बिगर मानांकन गट व रेटिंगप्राप्त खेळाडू गट अशा विविध घटना गटात खेळ घेण्यात येणार आहे
भोसरी भागातील कै. धोंडीराम फुगे सांस्कृतिक क्रीडा केंद्रात ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. .23 डिसेंबर पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे
अधिक माहितीसाठी चिन्मय मिलिंद नाईक 99 70 18 74 81 , 97 62 88 49 06 यांच्याशी संपर्क साधा असे आव्हान पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे व युवक काँग्रेस शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी केले आहे.