विजय उपनेता न्यूज : पिंपरी 20 /12 /2022 लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिराचे उद्घाटन मा. सौ सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या हस्ते मंगळवर दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक हॉल, आंबेडकर चौक पिंपरी या ठिकाणी उद्घाटन करण्यात येणार आहे .यामध्ये मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आलेआहे . या शिबिरामध्ये जनरल तपासणी ,स्तनाचे तपासणी, सुरक्षित ऐवम एकांत ठिकाणी महिला तज्ञामार्फत तपासणी, निर्दोक वेदना रहित आधुनिक तज्ञाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच दुर्दैवाने कॅन्सर झाल्यास पुढील तपासणी उपचार व शस्त्रक्रिया सल्ला व मार्गदर्शन होणार आहे. तरी जास्तीत जास्त पिंपरी चिंचवड शहरातील कॅन्सर पीडित महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रा.सौ. कविता संदेश आल्हाट ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड यांनी केले आहे .