विजयी उपनेता आणि न्यूज 14 /12 /2022 शिरोली ग्रामपंचायत निवडणुकीतील लोकप्रिय अपक्ष उमेदवार शुभांगी बारकू शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी कार्य फक्त शिरोली गांवाच्या विकासासाठी मी काम करणार आहे .गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये मी सदस्य असताना अनेक विकास कामे केली आहेत ,त्या कामाच्या जोरावर मी निवडणूक लढवत आहे .मी जरी पायाने अपंग असले तरी गावातील सुजन नागरिक हे माझे पाय आहेत त्यांनी आग्रह केल्यामुळे मी निवडणुकीला सामोरे जात आहे .मला ग्रामपंचायत सदस्य पदाचा अनुभव असल्यामुळे मी सरपंच झाल्यानंतर गावाचा चौफेर विकास करून जनसामान्यांच्या मूलभूत सुविधा जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. तसेच गावातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी नळाद्वारे पुरवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. महिलांना गृह उद्योगाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक स्वावलंबी करून त्यांची प्रतिमा उंचवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे. गावातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करणार आहे .शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजना व अवजारे ,बी -बियाणे, ट्रॅक्टर, शेती अवजारे इत्यादी मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे . तसेच गावातील घनकचरा व्यवस्थापन करून शिरोली गाव स्वच्छ आणि सुंदर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विधवा व ज्येष्ठ नागरिकांना शासनाची पेन्शन देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी गावातील सुजाण नागरिक बंधू भगिनींना माझी विनंती आहे की ,टेबल या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करून समाज सेवा करण्याची संधी द्यावी असे मी नम्र विनंती करते