विजयी उपनेता न्यूज – 13 / 12/ 2022 इंदोरी ग्रामपंचायत निवडणुकीतील लोकप्रिय उमेदवार श्री शशिकांत राजाराम शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, गावातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी मी निवडणुकीच्या रणांगणामध्ये उभा आहे. गावामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी मी कटीबद्ध राहणार आहे. गावातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे .तसेच गावामध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळून देण्यासाठी मी अग्रेसर राहणार आहे. तसेच गावातील शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल करून उच्च आणि दर्जेदार शिक्षण सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. तरुण-तरुणींना त्यांच्या कलागुणांना वाव देऊन एक आदर्श तरुण पिढी निर्माण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना विरूंगळा केंद्र निर्माण करणार आहे. विधवा व ज्येष्ठ नागरिकांना शासनाची पेन्शन देऊन त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे तरी इंदोरी गावातील सुजाण नागरिक बंधू-भगिनींना माझी नम्रतेची विनंती आहे की, ट्रॅक्टर या चिन्हा पुढील बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करून समाजसेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती करतो