विजयी उपनेता न्यूज 13/ 12/ 2022 शिरोली ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदाचे लोकप्रिय उमेदवार सौ .शिंदे सुनीता सोपान यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, मी सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळे गावातील महिला च्या अडीअडचणी आणि त्यांच्या समस्या मी जवळून पाहिले आहेत .आणि त्या सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे .महिला सक्षमीकरणासाठी विशेष भर देणार आहे .शिरोली गावाचा चेहरा -मोहरा बदलण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. गावाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे .गावातील सिमेंट रस्ते करण्यासाठी मी काम करणार आहे .गावातील कचरा व्यवस्थापन करून स्वच्छ व सुंदर शिरोली गाव करण्याचा मी प्रयत्न करणार आहे .शासनाच्या विविध विकास योजना खेचून आणून गावाचा सर्वांगीक विकास करणार आहे. विधवा, ज्येष्ठ नागरिक, यांना पेन्शन चालू करू त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवणार आहे .तरी सुजान नागरिक बंधू भगिनींना माझी नम्रतेची विनंती आहे की बॅट या चिन्हा समोरील बटन दाबून मतदानरुपी आशीर्वाद देऊन समाजसेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती करते