विजयी उपनेता न्यूज 12/ 12/ 2022 शिरोली ग्रामपंचायत निवडणूक मधील श्री जाखमाता परिवर्तन पॅनलचे सर्वसाधारण पुरुष गटातील लोकप्रिय उमेदवार वाडेकर संदीप भीमसेन यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की शिरोळी ग्रामपंचायत च्या माध्यमातून मी गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये विविध विकासकामे केली आहे .त्या कामाच्या जोरावर मी पुन्हा शिरोळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलो आहे .गावातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. गावातील गटारी भूमिगत करण्यासाठी माझा विशेष प्रयत्न राहील .शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल करून दर्जेदार शिक्षण मुलांना मिळावे म्हणून मी प्रयत्न करणार असून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन एक आदर्श तरुण पिढी घडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. गावांमधील मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहणार आहे. कोणताही पक्ष भेदभाव न करता गावातील नागरिक हाच माझा विकासाचा केंद्रबिंदू मानून मी काम करणार आहे . तसेच विविध विकास कामे खेचून आणून शिरोळी गावाचा चौफेर विकास केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही .तरी सुजान नागरिकांना बंधू– भगिनींना माझी नम्रतेची विनंती आहे .माझ्या रोडरोलर या चिन्हा समोरील बटन दाबून मतदान रुपी आशीर्वाद देऊन मला समाज सेवा करण्याची संधी द्याव ही नम्र विनंती करतो.