-
विजयी उपनेता न्यूज-11/12/2022 बहुळ ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदाच्या लोकप्रिय उमेदवार सौ .अश्विनीताई संदीप साबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, गावाचा चौफेर विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे .गावातील मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी गावातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मी प्रयत्न करणार असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीक विकास होण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव देऊन एक आदर्श नागरिक घडवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे. तसेच गावातील आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी व गावामध्ये रुग्णवाहिका चालू करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे .मुख्यतः गावातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीपूरक विविध योजना मी खेचून आणू गावातील शेतकऱ्यांना अधिक आर्थिक सक्षम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे .तसेच विधवा , ज्येष्ठ नागरिक यांना शासनाच्या पेन्शन योजना चालू करून महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक यासाठी गावामध्ये विरंगुळा केंद्र उभारणार आहे. तसेच गावातील नागरिकाला 24 तास स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. महिला ह्या फक्त चूल आणि मूल पर्यंतच मर्यादित न राहता एक आदर्श सरपंच म्हणून मी बहुळ गावाचा चौफेर विकास करण्यासाठी मी कटीबद्ध राहणार आहे. तरी बहुळ गावातील सुजाण नागरिक बंधू भगिनींना माझी एकच विनंती आहे की माझ्या गॅस सिलेंडर या चिन्हा समोरील बटन दाबून मला समाजसेवा रुपी आशीर्वाद देऊन गावातील नागरिकांची सेवा करण्याची करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती करते.