विजयी उपनेता न्यूज ,पुणे प्रतिनिधी 12/ 11/ 2022 सदर बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी साहिल अंबादास भोंगे वय 20 वर्षे धंदा शिक्षण राहणार 363 व्यापारी तरुण मंडळ जवळ काशेवाडी ,भवानी पेठ, पुणे हे दिनांक 10/ 9/ 2022 रोजी रात्री 02:30 वाजता दत्त मंदिर जवळ काशीवाडी भवानी पेठ पुणे येथे गणेश विसर्जनासाठी मिरवणूक पाहून घरी जात असताना आरोपी सिद्धार्थ संजय कांबळे अंदनान मुश्ताक बागवान, नजीर सलीम शेख ,आसिफ बाबूलाल शेख, यांनी एकत्र मिळून जुन्या कारणाचे वादावरून फिर्यादीस कुऱ्हाडीने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून खडक पोलीस ठाणे पुणे गुन्हा रजि. क्र. 271/2022 भादवी कलम 307, 323, 506, 34, भारतीय हत्यार कायदा कलम 4 (२५ ) महा. पो. कायदा कलम 37 (1 )(3) 135 प्रमाणे गुन्हा नोंद आहे
वरील प्रमाणे दाखल गुन्ह्यातील दोन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती यातील दोन आरोपींनी एक सिद्धार्थ संजय कांबळे वय 22 वर्षे राहणार महाराष्ट्र तरुण मित्र मंडळाजवळ 611 काशेवाडी भवानी पेठ पुणे दुसरा अंदमान मुस्ताक बागवान वय 21 वर्षे राहणार दीपज्योत तरुण मंडळ काशेवाडी भवानी पेठ पुणे हे गुन्हा दाखल झाल्या दिवसापासून अटक चुकण्यासाठी फरार होते नमूद पाहिजे आरोपीबाबत शोध व तपास चालू असताना आरोपी सिद्धार्थ संजय कांबळे हा गगनदीप अपार्टमेंट आंबेगाव बुद्रुक धनकवडी पुणे येथे आला असल्याबाबत पोलीस अंमलदार संदीप तळेकर व सागर गाडगे यांना बातमी दारात मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने श्रीमती संगीता यादव वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे व श्री राजेश तटकरे पोलीस निरीक्षक गुन्हे खडक पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आली आरोपी सिद्धार्थ कांबळे याच आंबेगाव बुद्रुक धनकवडी पुणे येथून सापळा रचून सीताफिने पकडण्यात आले आहे तसेच आरोपी अंदमान मुस्ताक बागवान हा न्यू ग्रेस इंग्लिश स्कूल जवळील कोंढवा पुणे येथे असल्याबाबत माहिती मिळाल्याने त्या सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे अशा प्रकारे दोन महिन्यापासून पोलिसाची अटक चुकवण्यात चुकविणाऱ्या दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यांमध्ये दिनांक 11 11 2022 रोजी 12 वाजून 30 मिनिटांनी अटक करण्यात आली आहे सदर कारवाई श्री अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त श्री राजेश डहाळे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री आर राजा पोलीस उपायुक्त परिमंडळ पुणे अतिरिक्त पदभार व श्री सतीश गोवेकर सह पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्रीमती संगीता यादव वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेश तटकरे पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश जाधव सर पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक सह पोलीस निरीक्षक श्री अतुल बनकर पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अमलदार अजित बॅग संदीप तळेकर सागर गाडगे विशाल जाधव नितीन जाधव लखन डावरे रफिक नदाफ अक्षय कुमार वाबळे महेश पवार महेश जाधव तेजस पांडे यांचे पथकाने केले आहे