-
विजय उपनेता न्यूज -पिंपरी चिंचवड पुणे 03/02/2023 येवला तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चैत्यभूमीच्या दिशेने निघालेल्या तथागत भगवान गौतम बुद्धाचा अस्थिकलश धम्म पदयात्रा गुरुवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी येवला मुक्त भूमी येथे दुपारी दाखल झाली यावेळी थायलंड ऊन आलेले बनते लॉंग पुंजी यांच्या प्रमुख उपस्थितीत 110 भिक्खू चासंघ या धम्म यात्रे सहभागी असून ,ही धम्म पदयात्रा दररोज 20 किलोमीटर पायी चालते 20 किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्यानंतर या धम्म यात्रेचा मुक्काम असतो .यादरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले उपासक उपासिका यांच्यासह धम्म यात्रे सहभागी झालेल्या भिक्खू आणि त्यांच्या सोबत असलेल्या उपासक-उपासिका यांना भोजनाची व्यवस्था करतात . आज या पदयात्रेला येवढा शहरात अबूतपूर्णा असे स्वागत करण्यात आले. अंदरसुल कडून येवला मुक्ती भूमी कडे जाताना संपूर्ण महामार्गावर उपासक उपासिका यांनी रांगोळी पुष्प टाकून तथागत भगवान गौतम बुद्धाच्या अस्थि घेऊन जाणारा रथ व पूज्य भिक्खू त्या टाकलेल्या फुल पुष्पावरून चालत असताना अनेक जिल्ह्यामधून आलेले बौध उपासक उपासिका बाल बालिका या अस्थिकलशाचे पूजन करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मार्गाने शुभ्र वस्त्र परिधान करून तसेच महिलांनी देखील पांढरी शुभ्र साडी परिधान करून हातामध्ये फुल गुच्छ घेऊन रस्त्याच्या दुतर्फामध्ये उभा राहून अस्थी कलशाचे दर्शन घेत होते .हा योग फार दुर्मिळ असा योग असून 2500 हजार वर्षांपूर्वी महानिर्वाण झालेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थि दर्शन मिळाले . अनेकांनी याची देही याची डोळा पहा तथागत गौतम बुद्ध बुद्धाच्या अस्थीचा भव्य असा दर्शन सोहळा भारत देशातील उपासक उपासिका ना थायलंड येथील भिक्खू संघाचे तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थिचे दर्शन घडून दिले त्याबद्दल अनेक भारतवासीयांनी थायलंड येथील भिक्खू संघाचे मनापासून आभार व्यक्त केली. या पदयात्रेच्या माध्यमातून अखंड विश्वाला तथागत गौतम बुद्ध यांच्या शांती आणि मैत्री याबद्दल संदेश दिला जात आहे. बुद्धम् शरणम् गच्छामि धम्मम शरणम् गच्छामि संपूर्ण येवला शहर निनांदले तथागत गौतम बुद्धाच्या अस्थी कलश एका काचेच्या पेटीत ठेवण्यात आला आहे .हे वाहन विविध रंगाच्या फुलांनी सजवण्यात आलेले आहे .या अस्थिकलसाचे दर्शन घेण्यासाठी उपासक उपासिकांनी येवला मुक्त भूमी येथे अभूतपूर्व अशी गर्दी केली होती .अंदरसुल करून येवला कडे येताना उपासक उपासिका बाल बालिका मोठ्या संख्येने धम्म पदयात्र सहभागी झाली होती. समता सैनिक दल हे धम्म रथावर लक्ष ठेवून होते .तर स्थानिक पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यामुळे कुठेही अडचण निर्माण झाली नाही. इसवी सन पूर्व 563 ते 483या काळातील तथागत भगवान बुद्धाच्या अस्थिचे हे पवित्र दर्शन मीळाले खरच आम्ही खूप भाग्यवान काही भाग्यवान आहेत की आम्हाला दर्शन मिळाले अशी भावना कोपरगाव येथील बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासंघाचे आदर्श बोधाचार्य शांताराम रणशूर ,दादासाहेब साबळे ,रत्नाकर गायकवाड ,रमेश गवळी, विजय जगताप, सातपुते नाना बिपिन गायकवाड उपासकानी आमच्या प्रतिनिधी प्रतिनिधीकडे बोलून दाखवली .आमच्या जीवनातील अविस्मरणीय असा क्षण आमच्या आयुष्यात आल्यामुळे आम्ही फार भाग्यवान आहोत .