-
विजयी उपनेता न्यूज 4/02/2023 -पुणे चिंचवड प्रतिनिधी चिंचवड दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनीताई यांना अखेर भाजप तर्फे उमेदवारी जाहीर झाली आहे .भाजप तर्फे उमेदवारी कोणाला मिळणार या तर्क वितरकाना पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारी जाहीर केली तर कसबा मतदारसंघात हेमंत रासणे यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने दोन्ही मतदार संघातील उमेदवार घोषित केले आहेत .या दोन्ही उमेदवारांचे अर्ज सोमवारी निवडणूक आयोगाकडे दाखल केले जाणार आहेत. या पोटनिवडणुकीमध्ये भाजपला सहानुभूतीचा फायदा होणार असल्यामुळे जगताप यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे