विजयी उपनिता न्यूज:- पुणे प्रतिनिधी 08 /03 /2023 बहुळ येथे जागतिक महिला दिन उत्साहमध्ये साजरा
मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा संगम असलेल्या स्त्री शक्तीला मानवंदना देण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत बहुळ, साबळेवाडी सिद्धेगव्हाण यांच्या मार्फत विविध कार्यक्रम सरपंच सौ. अश्विनीताई संदिपभाऊ साबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.
सर्वप्रथम सुभाष विद्यालय येथे वृक्षारोपण सरपंच अश्विनी साबळे, उपसरपंच शकुंतला वाडेकर, उपसरपंच सोनाली साबळे, उपसरपंच ज्योती साबळे, ग्रा.पं. सदस्या दिपाली आरेकर, रूपाली वाडेकर, अश्विनी काटकर, वर्षा साबळे, चाकण पोलीस अधिकारी वैशाली बोराडे आणि अर्चना हडावळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील मुलींनी विविध क्षेत्रातील कर्तुत्व गाजविलेल्या महिलांचे रूप धारण करून त्यांचे विचार समाजासमोर मांडले व स्त्री शक्तीचा जागर केला. त्यानंतर महिला आरोग्य विषयक मार्गदर्शन पी.एच.सी. बहुळ येथील डॉ. पाटील मॅडम, संगीता गवारे, सुवर्णा आरेकर, गंगावणे मॅडम यांनी सर्व महिलांना आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी व खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच महिलांची आरोग्य तपासणी करून, रोजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य टिकवण्यासाठी प्राणायाम व योग साधना यांचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी महिलांना प्रोत्साहित केले.
याप्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष माऊली भाऊ साबळे, पोलीस पाटील काळुराम साबळे, ग्रा.पं. सदस्य अभिजीत साबळे, शैलेश काटकर उपस्थित होते. या कार्यक्रमांसाठी बहुळ, साबळेवाडी, सिद्धेगव्हाण येथील विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रम नियोजनासाठी मीनाताई साबळे, अर्चना साबळे, नंदा आरेकर, मनीषा साबळे, सुरेखा वाडेकर, दिपाली पानसरे, सुवर्णा खलाटे व वैशाली पानसरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
सर्व महिला माता-भगिनींचा सन्मान व आभार सुभाष विद्यालयाचे प्राचार्य जोशी सर व जि.प.प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली मोरे मॅडम यांनी मानले.