विजयी उपनेता न्यूज २४/०२/ २०२३/ भारतीय संविधानाच्या विचारावर आधारित असलेल्या रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदि विशाल रेड्डी यांची एकमताने निवड करण्यात आली .विशाल रेड्डी यांनी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या माध्यमातून तळागाळातील माणसांची सेवा करण्याचे काम केले आहे .कष्टकरी कामगार यांच्यासह जनसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांना समाजकार्याची आवड असल्यामुळे पब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे मा. रामभाऊ खंडाळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन स्वागत करण्यात आले . व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या . त्यांच्या निवडीमुळे रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीला एक नवचैतन्य पण होईल असा विश्वास राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्ष सौ.सविता सिंग यांनी व्यक्त करण्यात आला