विजयी उपनेता न्यूज – २१/ ०२/२०२३ पुणे प्रतिनिधी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी महाराष्ट्र राज्य भारतीय संविधानाच्या विचारावर आधारित असलेल्या रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सौ मंगल अशोक शिरसाट कृष्णा नगर मोहम्मद वाडी हडपसर पुणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी पक्षाचे ध्येय धोरणे जनसामान्यापर्यंत पोहोचण्याचे काम केले असल्यामुळे मा .सविता सिंग राष्ट्रीय महिला आघाडी यांनी त्यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे . त्यांची कामाची आवड लक्षात घेता त्यांनां नियुक्तीपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या निवडीमुळे सौ मंगल ताई शिरसाठ यांचे सर्व क्षेत्रात स्वागत करण्यात येत आहे.