विजयी उपनेता न्यूज -प्रतिनिधी पिंपरी पुणे- 04/05/2023 शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही आमची आजपर्यंतचे राजकीय वाटचाल केली आहे .शरद पवार हे आमचे दैवत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही यापुढेही कार्यरत राहणार आहोत .त्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी आमची सर्वांची इच्छा असून त्यांनी राजीनामे मागे न घेतल्यास आम्हीही सामूहिक राजीनामे देऊ अशी जाहीर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावूक झाले .शरद पवार यांनी अचानक घेतलेला निर्णय हा कार्यकर्त्यांना मोठा धक्का देणारा ठरला आहे. त्याबाबत अजित गावाने यांनी एक पत्र प्रसिद्धह दिले असून त्यात त्यात म्हटले आहे की, आमच्या राजकारणाची सुरुवात शरद पवार यांच्याकडे पाहून झालु आहे .ते आमचे दैवत आहेत. आणि राजकीय आदर्श आहेत .त्याच्या मार्गदर्शनाशिवाय राजकीय क्षेत्रात काम करणे अशक्य आहे. शहरातील सर्वच कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयामुळे भावनिक वातावरण निर्माण झाले आहे .शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असायला हवेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे .त्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी आम्ही मागणी करत असल्याचेही गव्हाणे यांनी या पत्रात म्हटले आहे. दरम्यान शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करताच त्यांचे पडसाद पिंपरी -चिंचवड शहर राष्ट्रवादीमध्ये उमटले पक्षाच्या सर्वच माजी नगरसेवकासह आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते खराळवाडी येथील पक्ष कार्यात जमा झाले होते. त्यावेळी सर्वांनी शरद पवार यांनी राजीनामे मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.