विजयी उपनेता न्यूज- चिखली प्रतिनिधी पुणे 05/ 06/ 2023 अंकुर सेवा संघ प्रणित सिद्धार्थ बुद्ध विहार चे सचिव मा.अशोक खोपे यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्ध विहारातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पेन वाटप करण्यात आल्या. तळागाळातील विद्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक बांधिलकी म्हणून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जोपासत समाजात एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने साजरा करून वाढदिवसाला येणारा खर्च बुद्ध विहारातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी खर्च केला आहे. अशा या उच्च विचाशिल ,समाजाला दिशा देणाऱ्या चारित्र्यसंपन्न ,दृष्ट्या समाजसुधारकाला आमचा मनापासून मानाचा मुजरा, त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांचे आरोग्य निरोगी व भरभराटीचे जावो त्यांच्या हातून गोरगरीब लोकांची सेवा घडो अशी आम्ही गौतम बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देऊन ,पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या