विजयी उपनेता न्युज – चिखली प्रतिनिधी पुणे अंकुर सेवा संघ प्रणित सिद्धार्थ बुद्ध विहार चिखली येथील सचिव मा. अशोक खोपे हे आज 48 व्या वर्षात पदार्पण करत आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे .त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक दोन शब्द ,त्यांच्य व्यक्तिमत्वाबद्दल थोडेसे बोलावेसे वाटते,
अशोक होते है सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले एक व्यक्तिमत्व आहे. केवळ माझ्या कुटुंब व स्वतःपोटी न जगता मी एक समाजाचा घटक आहे. ही सामाजिक बांधिलकी मानून त्यांनी तळागाळातील विद्यार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊ त्यांच्या कलागुणांना जोपासत त्यांचेआज महाराष्ट्राभर धम्म संस्कार वर्ग चालू केले आहेत. हे काम करत असताना कोणत्याही आर्थिक लाभाचि फायदा मिळेल याची अपेक्षा न करता ते स्वतःच्या पैशातून धम्म संस्कार वर्ग चालू करून एक समाजाला आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.
त्यांचे कार्य समाजाला एक नवी दिशा देणारी आहे .त्यांनी आजपर्यंत कष्टकरी ,विधवा, बेरोजगार तरुणाला, आर्थिक मदत देऊन ,छोटे – मोठे आपले उद्योग निर्माण करून स्वतःने स्वतःच्या पायावर कसे उभे राहावे हा एक मुलमंत्र तरूनाला दिला आहे . गरिबाच्या यातना भोगत आज अशोक खोपे 48 व्या वर्षात पदार्पण होत आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त धर्म संस्कार वर्गात चिखली सह काकडे परिवार त्यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम बुद्धा चरणी प्रार्थना करतो, कि त्याचेे पुढील आयुष्य सुखी, समाधानी, भरभराटीचे जावो हीच सदिच्छा व्यक्त करतो.